…तर पुरस्कार मिळाल्याचा आनंद : दिलीप प्रभावळकर

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन

पुणे – आतापर्यंत अनेक भूमिका केल्या. मात्र, त्यापैकी महात्मा गांधी ही भूमिका आव्हानात्मक होती. गांधींच्या 150 व्या जयंती वर्षांत “पिफ डिस्टींग्विश्‍ड’ हा पुरस्कार मला मिळाल्याचा अधिकच आनंद वाटतो, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. महोत्सवांतर्गत देण्यात येणारा “पिफ डिस्टींग्विश्‍ड अवॉर्ड’ ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना प्रदान करण्यात आला. तर, ज्येष्ठ संगीतकार राम-लक्ष्मण यांना “एस.डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक ऍन्ड साउंड’ या पुरस्काराने सन्मानित केले. पुणेरी पगडी, शाल आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी गोविंद नेहलानी आणि दिलीप प्रभावळकर यांनी मनोगत व्यक्त केले.

महोत्सवातील स्पर्धा विभागांतील चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या परिक्षकांचा सन्मान यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये दिग्दर्शक बी. लेनिन, पटकथा लेखक कमलेश पांडे (भारत), अभिनेते आणि दिग्दर्शक क्रिस्टर होमग्रेन (स्वीडन), वेशभूषाकार डॅनिएला सिऍन्सिओ (इटली), दिग्दर्शक आणि निर्माते जोसेफ इस्त्राईल लेबन (फिलिपिन्स), दिग्दर्शक प्रसन्ना विथांगे (श्रीलंका), अभिनेत्री शबनम घोलीखानी (इराण), दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर थोर्सतन श्‍युट यांचा समावेश आहे.

यावेळी “टॅंगो’ नृत्याचे सादरीकरण झाले. प्रास्ताविक डॉ. जब्बार पटेल यांनी केले. सूत्रसंचालन अभिनेते सुमीत राघवन आणि क्षीतिज दाते यांनी केले. रवी गुप्ता यंनी आभार मानले.

उद्‌घाटनाला “सांस्कृतिक मंत्री’ अनुपस्थित
दरवर्षी “पिफ’च्या उद्‌घाटनाला उपस्थित असणारे सांस्कृतिक मंत्री यावर्षी अनुपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यास उशीर झाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)