…तर पशुवैद्यकीय विभाग बंद करा!

वाकड – थेरगावमधील गुजरनगर, संतोष नगर, बेलठीकानगर भागात ऐन पावसाळ्यात भटक्‍या जनावरांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. या जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी करुनही पशू वैद्यकीय विभाग कार्यवाही करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे हा विभागच बंद करून टाका , अशी मागणी नगरसेविका माया बारणे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेली काही दिवसापासून शहरात पावसाने चांगलाच जोर धरला असून सगळीकडे चिखलाचा राडा झाला आहे. कचराकुंडी व आडोशाच्या मोकळ्या जागेत डुकरे, भटकी कुत्री यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे यापरिसरात यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.

याची दखल घेत स्थानिक नगरसेविका माया बारणे यांनी महापालिकेच्या पशूवैद्यकिय विभागाकडे या भटक्‍या जनावरांचा बंदोबस्त करण्याची वेळोवेळी मागणी केली आहे. मात्र, या विभागाकडून या मागणीवर कोणतही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भटक्‍या जनावरांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेला पशूवैद्यकीय विभाग कायमचा बंद करण्याची मागणी माया बारणे यांनी केली आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)