…तर पवनाथडीचा विचार करावा लागेल!

पिंपरी – गेली अनेक वर्षे पवनाथडी जत्रेचे आयोजन करूनही महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले नाही. त्यामुळे हा उद्देशच साध्य न होत नसल्यास पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे की नाही?, याचा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे महिला आणि बालकल्याण योजनेंतर्गत आयोजित पवनाथडीचे जत्रेचे उद्‌घाटन आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आमदार जगताप बोलत होते. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन चिंचवडे, सभागृह नेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा स्वीनल म्हेत्रे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार जगताप म्हणाले, महिला बचत गटांना पाठबळ देणे, हे पवनाथडी जत्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी बचत गटातील महिलांनी आपल्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे. महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी देखील महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले पाहीजेत, असेही ते म्हणाले. अंजली भागवत म्हणाल्या, पवनाथडी जत्रा म्हणजे उद्योजक महिलांचे ऑलिम्पिकच आहे. महिला उद्योजकांनी व्यवसायात आत्मविश्वासाने पुढे जावे. महापौर जाधव, स्वीनन म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिन चिंचवडे यांनी आभार मानले.

उद्‌घाटनासाठी दोन तासांची प्रतिक्षा
महापालिकेतर्फे सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्‌घाटन सकाळी अकरा वाजता आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते होणार होते. त्यामुळे ठरलेल्या वेळेत अंजली भागवत, महापौर राहुल जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित झाले. परंतु दुपारचे पाऊण वाजले तरी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप हजर झाले नाहीत. त्यामुळे अंजली भागवतसह सर्व पदाधिकाऱ्यांना उद्‌घाटनासाठी तब्बल दोन तास ताटकळत थांबावे लागले. अखेर एकच्या सुमारास आमदार जगताप उद्‌घाटनस्थळी दाखल झाले अन्‌ उद्‌घाटन सोहळा पार पडला. मात्र, उपस्थितांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)