…तर नरेंद्र मोदी देशाचे सर्वात मोठे राष्ट्रविरोधी ठरले पाहिजेत- कॉंग्रेस

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिध्दू यांनी हजेरी लावली होती. शपथविधीप्रसंगी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्याप्रकरणी सिद्धू यांच्यावर चौफेर टीका होत आहे. भाजपने सुद्धा सिध्दू यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, कॉंग्रसने भाजपवर चांगलाच पलटवार केला आहे. जर सिद्धू पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेणे राजद्रोह असेल तर नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये पाकिस्तानला जाऊन लाहोर मध्ये नवाज शरीफ यांची गळाभेट घेऊन काय केले ?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पंजाब सरकारचे मंत्री असलेले सिद्धू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर देशात शोक असतांना पाकिस्तानला जातात. कॉंग्रेस दिवसेंदिवस “लोकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करीत” असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावर कॉंग्रसने सुद्धा जशाच तशे उत्तर दिले आहे. पाकिस्तानला भेट देणे म्हणजे राष्ट्रविरोधी आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2015 मध्ये पाकिस्तानला जाऊन काय केले? असा प्रश्न कॉंग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

“जर पाकिस्तानला जाणे हे राष्ट्रविरोधी घोषित करण्यासारखे आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे या देशाचे सर्वात मोठे राष्ट्रविरोधी ठरले पाहिजेत,” शेरगिल यांनी नरेंद्र मोदींचे २०१५ अफगाणिस्तानचा एक दिवसाचा दौरा झाल्यानंतर परत येतांना लाहोरमध्ये गेले होते तेव्हाचा फोटो सुद्धा पत्रकार परिषदेत दाखवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)