…तर धोनीच्या फिल्डिंगनेही सर्वजण अवाक

बंगळुरु: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गाजवला. चेन्नईनं या सामन्यात बंगळुरुवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते.

अंबाती रायुडू आणि धोनीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागिदारीनं चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. बंगळुरुच्या डावात तिसऱ्या षटकात दीपक चाहरने डी कॉकला गोलंदाजी केली. एक चेंडू डी कॉकच्या बॅटला लागून उंच उडाला. त्यावेळी तो चौकारच जाईल असं सर्वांना वाटत होतं.

मात्र, उंच उडालेला चेंडू पकडण्यासाठी विकेटकीपर असलेला धोनी सीमारेषेजवळ धावत आला होता. धोनीने बाऊंड्री लाईन ओलांडणारा चेंडू चपळाईने अडवला. शिवाय त्याने दोन धावाही वाचवल्या. विकेटकीपर असलेला धोनी सीमारेषेजवळ धावत आल्याने, त्याच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)