…तर देशात नवीन इतिहास घडणार!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण : माजी खासदार संभाजी काकडे यांचा गौरव

पुणे – देश आणि राज्यात नवी समीकरणे होऊ पाहत आहेत. ती आकाराला आली, तर नवा इतिहास घडणार आहे. त्यासाठी लालांनी अनुभव आणि मार्गदर्शनाची गरज आहे, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.

माजी खासदार संभाजी काकडे (लाला) यांच्या गौरव समांरभात ते बोलत होते. लोकनेते संभाजीराव काकडे गौरव समितीच्या वतीने माजी खासदार काकडे यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चव्हाण यांच्या हस्ते काकडे यांना मानपत्र देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, माजी राज्यपाल डी.वाय. पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री दादा जाधवराव, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन पाटील, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर, कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

लाला यांचे त्यांच्या सक्रीय राजकारणाच्या काळात देशाच्या तीन पंतप्रधानांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांना केंद्रात मंत्रीपद सहज मिळू शकले असते. मात्र, त्यांना कार्यकर्त्यांमध्ये रमण्याची तीव्र इच्छा होती. शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच किंगमेकरची राहिली होती. देशात, राज्यात नवीन समिकरणे मांडण्याची वेळ आली आहे. ही नवे समिकरणे आकाराला आली तर राज्याचा, देशाचा इतिहास बदलेल. पुढील वर्षी निवडणुका होत असून त्यापार्श्वभूमीवर लालांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत येवून नवीन समिकरणे मांडावीत. त्यांच्या अनुभवाचा निश्‍चित फायदा होईल, अशी इच्छा ही चव्हाण यांनी यावेळी व्यक्‍त केली.

या सगळ्यांना जवळ ठेवण्याचे कसब खऱ्या अर्थाने लाला यांच्या पत्नी कंठावती यांच्याकडे होते, असे सांगताना आढाव यांनी लालांचे खरे वर्णन हे कार्यकर्त्यांचा लाला असेच करावे लागेल, असे स्पष्ट केले. काकडे यांचे निकटचे सहकारी माजी मंत्री दादा जाधवराव, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन पाटील आणि डी.वाय पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदानंद शेट्टी यांनी तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. बुवा नलावडे यांनी आभार मानले.

नोटाबंदीने शेतकऱ्यांचे वाटोळे केले
नोटांबदी आणि जीएसटीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही. महागाई वाढते आहे. शेतकऱ्यांसाठी काही नसून जे काही आहे ते धनिकांसाठी आहे. देशात गरीब निर्माण करायचे आणि श्रीमंत ठराविक निर्माण करण्यात येत आहेत. संपत्ती ही विनाशाकडे नेणारी असून सच्चाईने वागणे हा एकच जीवनाचा मंत्र आहे, असे माजी खासदार काकडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)