…तर तीन वर्षात पुणे होईल “स्मार्ट’ – अरुण फिरोदिया

????????????????????????????????????

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – “वाहतूक व्यवस्थेबरोबरच कचरा व्यवस्थापन ही पुणे शहरासमोरील असलेली मुख्य समस्या असून, कचरा व्यवस्थापनाचे खासगीकरण करून, त्याद्वारे बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास केवळ तीन वर्षात पुणे शहर स्मार्ट झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे मत प्रसिद्ध उद्योजक अरुण फिरोदिया यांनी व्यक्‍त केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया पुणे केंद्राच्या हीरकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, संस्थेचे अध्यक्ष गिरीश मुंदडा, मानद सचिव अविनाश निघोजकर, माजी सचिव वसंत शिंदे, सुरेखा देशमुख आदी उपस्थित होते. परिसंवादाचा विषय “पुणे स्मार्ट सिटी : सद्यस्थिती आणि आव्हाने’ हा होता.

फिरोदिया म्हणाले, कचरा निर्मूलनाच्या समस्येवर प्रभावी उपाय करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शहर डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची राजधानी होऊ घातले आहे. सध्या महापालिका कचरा निर्मूलनासाठी प्रतिवर्ष 3 हजार 600 कोटी रुपये खर्च करते. कचरा जमा करण्याच्या कामाचे खासगीकरण केल्यास त्यातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल. हे काम अधिक कार्यक्षमतेने होऊन पुणेकरांचे आरोग्य सुरक्षित राहील. तेव्हाच खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट झाल्याचे म्हणता येईल.

शहराभोवती “रिंग रोड’ करून त्याच्या आजबाजूला “सॅटेलाईट सिटी’ विकसित करून शहराच्या वाढत्या लोकसंख्येचे विभाजन करावे. कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना 20 मिनिटात अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याची व्यवस्था करावी. घराजवळ चांगल्या शाळा उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांची गळती थांबावी, शेतकऱ्यांना आपले उत्पादने थेट बाजारात आणता यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

“फ्युचर रेडी’ शहराकडे वाटचाल
“5 जी’ तंत्रज्ञान उपलब्ध असलेले “फ्युचर रेडी’ शहर विकसित करण्याच्या उद्देशाने पुण्याच्या विकासाचे नियोजन असून, त्यासाठी 15 वर्षात 31 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारसह कर्जरोखे आणि खासगी गुंतवणुकीतून हा निधी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)