…तर ड्रंक अँड ड्राईव्ह पडेल महागात

परवाना कायमचा रद्द करण्याची वाहतूक पोलिसांची चाचपणी

पुणे – गुजरात राज्याच्या धर्तीवर एखादा नागरीक दोनवेळा “ड्रंक अँड ड्राईव्ह’ तपासणीमध्ये दोषी आढळल्यास त्याचा परवाना कायम स्वरुपी रद्द करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपूते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

उपायुक्त सातपूते म्हणाल्या, “ड्रंक अँड ड्राईव्ह’मध्ये एखादी व्यक्ती सापडल्यानंतर त्यांच्यावर खटला दाखल केला जातो. त्यानंतर त्यांना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार 1 ते 5 हजारपर्यंत दंड आकारला जातो. तसेच आदेशानुसार, संबंधीत वाहन चालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला जातो. वाहन चालकाच्या तपासणीनंतर जप्त केलेले हे परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून निलंबित केले जातात. मात्र, शहरात “ड्रंक अँड ड्राईव्ह’चे प्रमाण लक्षणीय आहे. तसेच हा आकडा वाढतच असून या प्रकारांना आळा बसवा, अपघातांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत, असे सातपूते यांनी सांगितले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे विचारणा
गुजरात राज्यात दोनवेळा “ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाईत एखादी व्यक्ती आढळल्यास त्यांचा वाहन परवाना कायमस्वरुपी निलंबित केला जातो. त्याच धर्तीवर राज्यातही याची अंमलबजावणी करणे शक्‍य आहे का? याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे विचारणा करण्यात आली आहे. तसेच गुजरात राज्याने यासाठी काही स्वतंत्र कायदा केला आहे का? याची माहितीही घेतली जात असल्याचे सातपूते म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रात अशी तरतूद नसल्यास त्यासाठी कायद्यात बदल करावा लागणार असल्याचेही सातपूते यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)