…तर ठेऊ शकता नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर 

नवी दिल्ली:  गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी मोदी सरकावर दिलेल्या आश्वसनाची पूर्ती न केल्याचा आरोप केला आहे. तसेच येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी भाजप विरोधी पक्षांना समर्थ करणार असल्याचे सांगितले. वाघेला म्हणाले, ” मी कोणत्याही एका दलाचा नसून मी फक्त भाजप विरोधी आहे. आगामी निवडणुकांमध्ये मोदी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी काम करेल”
मोदी सरकार  चार वर्षांपूर्वी १०० स्मार्ट सिटी, सर्व शेतांमध्ये पाणी, प्रत्येक वर्षी २ करोड नोकरी, अशे मोठे मोठे आश्वासने देऊन सत्तेत आले. मात्र नोटबंदी सोडून या सरकाने कोणतेच काम केले नाही.  तसेच गुजरात मॉडेल किचड मॉडेल आहे. अशी टीकाही त्यांनी केली.  लोकसभा निवडणूका राज्यातील स्थानिक परिस्थिती पाहून लढवाव्या यामध्ये अंतर्गत मतभेदांमुळे एकाही मतदाराचे मत वाया जाऊन त्याचा भाजपाला फायदा होऊ नये, याची दक्षता घावी.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)