…तर जम्मू-काश्मीरचे सरकार पाडून टाका – सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लष्कर जवानांविरोधात एफआयआर दाखल करण्यावरुन जम्मू काश्मीर सरकार वर जोरदार टीका केली आहे. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार असल्याचे एका वृत्तसंस्थेशी बोलतना त्यांनी म्हटले.
‘जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जवानांविरोधात दाखल झालेला एफआयआर तात्काळ मागे घेतला पाहिजे, नाहीतर सरकार पाडून टाका’. सुब्रमण्यम स्वामी यावेळी प्रचंड भडकलेले दिसत होते. संतापलेल्या स्वरात त्यांनी हे सरकार पाडलं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते बोलले की, ‘आम्ही असले सरकार का चालवत आहोत माहित नाही? आजपर्यंत ही गोष्ट समजलेली नाही’. शनिवारी काश्मीर खो-यात शोपियन येथे दोन नागरिकांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी लष्कर जवानांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शनिवारी 27 जानेवारी रोजी शोपियन जिल्ह्यातील गानवपोरा गावातून लष्कराचं पथक जात होतं, त्यावेळी तिथे आंदोनकर्त्यांनी जवानांवर दगहफेक करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर एका कमिशन्ड अधिका-याच्या हातातून त्याची सर्व्हिस रायफल खेचण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यानंतर लष्कर जवानांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई केली होती’. लष्कर प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती हाताबाहेर गेली असल्या कारणाने जवानांकडे फायरिंग करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)