…तर जन्मठेप होईल! परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही- अजित पवार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला सतर्कतेचा इशारा : दुष्काळावर साधला संवाद

भिगवण: सरकारने अन्नभेसळ विरोधाचा कायदा मंजूर केला असून जर कोणी भेसळ करताना आढळला तर त्याला चिक्‍की पिसिंग ऍन्ड पिसिंग करावे लागेल. त्यासाठी आताच सांगतो, परत म्हणू नका, दादांनी सांगितले नाही. हा कायदा आता मंजूर झाला असून त्यासाठी जन्मठेप होणार आहे, असा सतर्कतेचा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. भिगवण येथील आयोजित उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना जादा दुधासाठी मिळणारे पाच रुपये हे मिळणार आहेत. आपण त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. आपल्याला पाच रुपये मिळतील. पण त्यासाठी दुधात भेसळ करू नका, भेसळ केल्यास आपल्याला खडी फोडायला जावे लागेल. या भेसळीसाठी नवीन कायदा केला आहे. त्यासाठी सरळ जन्मठेप होणार आहे. त्याला जामीन नाही. म्हणून पुन्हा सांगतो, भेसळीचा गुन्हा करू नका आणि जर कोणी करत असेल तर त्यालाही सांगा, बाबा आता पहिले दिवस राहिले नाहीत. असा गुन्हा करणारा कोणत्याही पक्षाचा नसतो किंवा कोणाचाही कार्यकर्ता नसतो.

पवार म्हणाले की, 6 महिने हे 1972 पेक्षा वाईट येणार आहेत. त्यासाठी येत्या काळात आपला संसार नीटनेटका करा, उगीच कारण नसताना पुणे, मुबईचे दौरे करू नका. उजनी धरण आताच 50 टक्‍क्‍यांवर आले आहे. उद्या पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. पण त्यासाठी आपणही रस्त्यावर उतरले पाहिजे. नाही तर “तुम लढो…’ अशी अवस्था व्हायला नको. कारण या सरकारला फक्‍त आंदोलनाचीच भाषा समजते. मराठ्यांनी शांततेत 58 मोर्चे काढले. त्यावेळी 42 बळी गेले. त्यावेळी कुठे सरकार जागे झाले आणि आरक्षण दिले. म्हणून सांगतो की, वेळ पडल्यास आपल्याला रस्त्यावर उतरून या सरकारला जागे करावे लागेल. ते म्हणाले की, शेतकरी टॅक्‍स भरत नाही, असे म्हणतात. हे साफ खोटे आहे. शेतकरी साखर, बगॅस, मोलॅसिस आदी स्वरूपातून सरकारला एक टनासाठी जवळपास 400 रुपये टॅक्‍स भरतात. त्यामुळे आपल्या हक्‍कासाठी आपल्याला हे सर्व आपल्याला करावे लागले. यावेळी त्यांनी त्यांनी अनेक विषयांना हात घालत या सरकारवर चौफेर टीका केली. याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने. प्रदीप गारटकर, महारुद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1036 :thumbsup:
237 :heart:
5 :joy:
13 :heart_eyes:
21 :blush:
7 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)