तर गॅंगरेपमधील सर्व आरोपी दोषी…

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
मुंबई – सामुहिक बलात्कार प्रकरणात एकाहून अधिक आरोपींनी जर समान हेतुने कृत्य केलेले असेल तर एका आरोपीने बलात्कार केला असला तरी अन्य सर्व आरोपीही त्या प्रकरणात दोषी ठरतात, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

सत्रन्यायालयाने 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी दोषी ठरविलेल्या एका आरोपीने दाखल केलेले अपील न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी फेटाळून लावताना हा निर्वाळा दिला.

याप्रकरणी आरोपी अश्‍पाक लालमोहम्मदला कल्याणच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने जानेवारी, 2014मध्ये दोषी ठरवून 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने दाखल केलेले अपिलावर न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्यापुढे सुनावणी झाली.

21जून, 2011 रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी ही पुण्याहून आलेल्या ट्रेनमधून कल्याण स्थानकात उतरली होती. तिथे तिचा बॉयफ्रेण्ड तिची वाट पाहत होता. प्लॅटफॉर्मवर दोघांची भेट झाल्यानंतर ते चालत प्लॅटफॉर्मच्या टोकाला आले व तेथील संरक्षक भिंतीजवळ बसले होते. याच दरम्यान आरोपींपैकी तिघांनी त्यांच्याजवळ येऊन त्याठिकाणी बसण्याबाबत जाब विचारला. आरोपी अनिलकुमार पाठकने पिडितेच्या बॉयफ्रेण्डला मारहाण करत ब्लेडने वार करण्याची धमकीही दिली.

यावेळी पिडित व तिच्या बॉयफ्रेण्डने पळण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आरोपींपैकी एकाने पकडले. त्यानंतर आरोपी अनिलकुमार पाठक आणि अश्‍पाक लालमोहम्मदने 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तसेच आणखी एक आरोपी जकीर खाननेसुद्धा तिच्यावर बलात्कार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, पिडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी देताच आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)