…तर गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांची मागणी

अहमदनगर: शनि मंदीर आणि दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळवूण देण्यात यश आल्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी आपला मोर्चा दारू बंदीकडे वळवला आहे. दरम्यान, त्यांनी मतदारांना दारु पाजून निवडणूक जिंकणे ही राजकीय हत्याच असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना हप्ते देऊन अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हाच पारदर्शक कारभार आहे का? अवैध धंदे बंद होत नसतील तर गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील तृप्ती देसाई यांनी केली आहे.
पांगरमलच्या दारु कांडातील बळीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही मागणी केली. यावेळी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पोलिसांवर टीकास्त्र सोडले. पोलिसांना हप्ते मिळत असल्याने आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थाने दारुकांड घडले. या दारुकांडातील मृतांच्या नातेवाईकांना शिवसेनेने दत्तक घ्यावे. अशी मागणी देसाईंनी केली आहे. अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असून मुख्यमंत्री पारदर्शक कारभार असल्याचे सांगतात. मात्र, गृहमंत्र्यांनी राज्यातील सर्व अवैध धंदे बंद करावेत, नाहीतर गृहमंत्रीपद सोडावे,अशीही मागणी त्यांनी केली. राजकीय फायद्यासाठी अवैध धंद्यातून हत्या होणार असतील तर अच्छे दिन कोणासाठी आले आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निवडणूकी पूर्वी दारु बंद करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. तसेच मार्च महिन्यात दारु मुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची सुरुवात नगरमधून करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)