…तर गुरुवारी शरद पवार पंतप्रधान; शहांनी उडवली खिल्ली !

कानपूर: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या महाआघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. जर देशात महाआघाडीची सत्ता आली तर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश, बुधवारी ममता बॅनर्जी, गुरुवारी शरद पवार, शुक्रवारी देवेगौडा, शनिवारी स्टॅलिन अशाप्रकारे दररोज पंतप्रधान बदलावा लागेल. अशी खिल्ली त्यांनी उडवली. ते कानपुर येथील सभेत बोलत होते.

तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे मोदी व भाजपच्या विरोधात सभा घेतली होती. सभेला देशातील 20 प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वांनी मोदी सरकारच्या विरोधात संघटीतपणे एल्गार पुकारून हे सरकार सत्तेवरून घालवून देण्याचा निर्धार व्यक्‍त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)