…तर कलाकार, रसिकांचे अतूट नाते निर्माण होईल

  • उत्तम फडतरे : कळंब येथे एकदिवसीय चित्रकला मार्गदर्शन शिबिर

जंक्‍शन – चित्र कशी पहायची याचे लोकशिक्षण चित्रकारांनीच केले तर कलाकार आणि रसिक यामध्ये अतूट निर्माण होईल, असे मत ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठान अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी व्यक्‍त केले.
पुणे जिल्हा कलाध्यापक संघ संलग्न इंदापूर तालूका कलाध्यापक संघ व ज्ञान कला क्रीडा कृषी प्रतिष्ठान कळंब यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवारी (दि. 12) कळंब येथील श्री व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मीडिअम येथे एकदिवसीय चित्रकला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी फडतरे बोलत होते. दरम्यान, पुणे जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष श्रावण जाधव, सचिव सुनिल बोरले, जंक्‍शन येथील भारतीय कला महाविलयाचे अध्यक्ष भारत बोराटे, श्री व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य संदिप पानसरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वतीची पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी इलेमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय ग्रेड परीक्षेला क़से सामोरे जायचे याचे प्रशिक्षण देणारे संदिप यादव यांनी स्थिरचित्र याविषवर मार्गदर्शन केले. बिरु नायकुडे यांनी स्मरणचित्रा बद्दल मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर केली. तसेच नंदिकेश्‍वर विद्यालय व ज्युनियर महाविद्यालय, व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मीडियम स्कूल, कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, डेफोडिल्स स्कूल, भारत चिल्ड्रन ऍकॅडमी या शाळांतील विद्यार्थी व कलाशिक्षक यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल कोकरे, महैश मोरे, कलावंत भिसे, स्वाती भोसले, राकेश खंडागळे, टिंकल देशमुखे आदी शिक्षक-शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बापू कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन सारिका पानसरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)