…तर उद्या पावसामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील- अखिलेश यादव

मुंबई : पालघर, भंडारा-गोंदिया तसेच उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला आहे.

‘आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. उद्या म्हणतील पावसामुळे आणि थंडीमुळे असे होत आहे. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवू इच्छितात. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करत आहेत’, असे ट्विट करत अखिलेश यांनी भाजपावरही टीका केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)