…तर आम्ही देखील नीरज चोप्रा सारखे वागू – लष्करप्रमुख बिपीन रावत

नवी दिल्ली:आशियाई क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमसोबत हस्तांदोलन केले होते. दरम्यान, लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानने दहशतवाद थांबवला तर लष्करदेखील मिरज चोप्रा सारखे वागेल,  असे वक्तव्य केले आहे. आशियाई क्रिडा स्पर्धेत पदक विजेत्यांचा लष्कराकडून सत्कार करण्यात आला, तेव्हा रावत बोलत होते.

बिपीन रावत म्हणाले,  पाकिस्तानने पहिलं पाऊल उचलावं. त्यांनी दहशतवाद थांबवायला हवा. जर त्यांनी दहशतवाद थांबवला तर आम्हीदेखील नीरज चोप्राप्रमाणे वागू’. नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तसेच २०१७ पेक्षा काश्मीरची परिस्थिती सुधारली असल्याचे रावत यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)