… तर आम्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार – प्रकाश करात

नवी दिल्ली – काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या मुद्यावरून  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये एकमत होताना दिसत नाहीये. मात्र भाजपला पराभूत करण्यासाठी जे -जे पक्षाला शक्य असेल ते केलं जाईल. असं वक्तव्य  पक्षाचे माजी सरचिटणीस प्रकाश करात यांनी केलं आहे. त्यासाठी जर आम्हाला काँग्रेससोबत आघाडी करावी लागली तरी आमची तयारी असेल असंही त्यांनी म्हंटल आहे.

‘पीपल्स डेमॉक्रसी’ या पक्षाच्या मुखपत्रात करात यांनी संपादकीय लेखात याविषयी मत मांडले आहे. भाजपाला पराभूत केले जाऊ शकते हे उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकातून स्पष्ट झाले आहे. जर सर्वच मोठे  पक्षभाजपाविरोधी एकत्र आले तर छोट्या पक्षांचेही त्यांना समर्थन मिळेल, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)