…तर आतापर्यंत जोकरने खेळत होता का ; परेश रावल यांचे काँग्रेसवर टीकास्त्र !

नवी दिल्ली: प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाल्यामुळे अनेक राजकीय दिग्गज विविध तर्क वितर्क लावत आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्ष चांगलाच चर्चेत आला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ट्रंप कार्ड चालवत मोठा राजकीय डाव खेळल्याचे बोललं जात आहे. तसेच काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.

भाजप खासदार परेश रावल यांनी प्रियांका गांधी यांच्या निवडीवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. रावल यांनी राहुल गांधींसाठी ‘आपत्तिजनक’ शब्दाचा वापर केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले ” ते म्हणतात आता आम्ही ट्रम्प कार्ड चालवले, तर आतापर्यंत जोकर खेळत होतात का ? असा प्रश्न त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीला केवळ दोन-तीन महिनेच बाकी राहिले असताना कॉंग्रेसने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. पक्षाने प्रियांका गांधी-वढेरा यांना राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला असून त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आले आहे. सध्या त्यांच्याकडे पुर्व उत्तरप्रदेशच्या प्रभारी म्हणूनही काम सोपवण्यात आले आहे. पक्षाच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशात कॉंग्रेस पक्षाने स्बळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर पक्षातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या राजकारण प्रवेशा विषयी गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. पण प्रियांकांची राजकारणातील भूमिका कॉंग्रेसने मर्यादितच ठेवली होती. मध्यंतरी त्यांनी फक्त आपल्या मातोश्रींच्या रायबरेली मतदार संघावरच लक्ष केंद्रीत केले होते. आता त्यांना अधिकृतपणे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आल्याने त्यांना आता अधिकृतपणे पक्षाच्या कारभारात लक्ष घालणे शक्‍य होणार आहे. पक्षाने सुरूवातीच्या टप्प्यात त्यांच्यावर पुर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली असून ज्योतिरादित्य शिंदे यांना पश्‍चिमी उत्तरप्रदेशचे प्रभारी करण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)