तर असा असेल ‘भारत’ चित्रपटातील सलमान खान व कॅटरिना कैफचा लूक

सलमान खानचा मोस्ट अवेटेड ‘भारत’  चित्रपटाचा टिझर स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आला होता.  या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत सलमान खान आणि कॅटरिना कैफ असणार आहेत. या दोघांचा भारत चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला.

सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलेल्या या लूकमध्ये सलमान खान आणि कॅटरिना कैफ अतिशय सुंदर दिसत आहेत. सलमान खान काळ्या पठाणी ड्रेसमध्ये दिसत असून कॅटरिना कैफ हिरव्या लेहंगामध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोला केवळ नऊ तासात ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स भेटले आहेत.

-Ads-

मैने प्यार क्‍यों किया, पार्टनरपासून एक था टायगर आणि टायगर जिंदा है सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आतापर्यंत सलमान आणि कतरिना यांनी एकत्र काम केले आहे. त्यांचे चाहते दोघांना एकत्र पाहण्यासाठी कायमच आतुर असतात. त्यामुळे ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर जादू चालवू शकेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसह  कॅटरिना  कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नात्यांच्या गुंतागुतीवर हा चित्रपट आधारित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग माल्टा येथे चालू आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)