…तर ‘अशा’ मुलांना भेडसावतो लठ्ठपणाचा गंभीर धोका

लंडन :  सध्या ब्रिटनमध्ये अनेक मुलं लठ्ठपणाच्या समस्येशी झुंजत आहेत. तिथे प्राथमिक शाळेत जाणारी सुमारे ५० टक्के मुलं लठ्ठ असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर वार्विक विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतची एक पाहणी केली. जी मुलं आठ तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांना लठ्ठपणाचा धोका अधिक असतो,असे आता संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी १८ वर्षांखालील 75 हजारपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. त्यामधूनच झोप आणि लठ्ठपणाचा असा संबंध उघड झाला. सलग तीन वर्षे याबाबतची पाहणी करण्यात आली. यावर आता पालकांनी वेळीच लक्ष देण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)