…तर अन्य कचरावेचक बेघर?

पिंपरी –महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची नवीन निविदा काढली आहे. या निविदेनुसार कचरा संकलन करण्यासाठी असणाऱ्या वाहनावरील एक कर्मचारी कमी केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित कचरा वेचकांवर अन्याय होणार असून, ते बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे घनकचऱ्याच्या निविदेत दुरूस्ती करून कचरा वेचकांना न्याय द्या, अशी मागणी कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतीच्या वतीने करण्यात आली.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली. या वेळी सोनाली कुंजीर, सुरेखा म्हस्के, गीता तामचीकर, आशा खरात, सीता पवार, सोमनाथ दळवी आदी उपस्थित होते. शहरात दररोज कचरा गोळा करण्यासाठी 1 हजार 200 कामगार काम करत आहेत. त्यामध्ये कचरा गोळा करणे व वाहन चालवणे आदी लोकांचा समावेश आहे. एका वाहनांवर 1 वाहनचालक आणि दोन कामगार असे प्रकारचे काम 2010 पासून वेगवेगळ्या संस्था व ठेकेदारामार्फत 800 कामगार व 400 वाहनचालक काम करत आहेत. सध्या महापालिकेच्या वतीने आठ वर्षांसाठी नवीन निविदा काढण्यात आली आहे. त्यामध्ये सध्या काम करणाऱ्या सर्व कामगारांना कामावर घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख नाही. एका वाहनावर एक कचरावेचक असा उल्लेख आहे. त्यामुळे कामगारांची पिळवणुक होणार आहे. त्यामुळे कचरावेचकांच्या मागण्या पुर्ण करा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी पुढील मागण्या करण्यात आल्या.

-Ads-

एका गाडीवर दोन कामगारांची अट असावी. जे आता सध्या कामागार करत आहेत. त्या सर्व कामगारांना या ठेक्‍यात कामावर घेणे बंधनकारक करण्यात यावे. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम प्रमाणे जास्तीत जास्त कचरावेचकांचा समावेश करावा. अधिक कामगारांची गरज असल्यास अधिक कामगार घ्यावेत. निविदेची वर्क ऑर्डर देताना या मागण्या नमूद कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.आम्ही नंतर कचरावेचकांचा समावेश करणार असल्याची माहिती या वेळी आयुक्त हर्डीकर यांनी संघटनेला दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)