तरूण विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे : उपराष्ट्रपती

पिंपरी – “उच्च शिक्षणासाठी देशातील तरुण विद्यार्थी देशाबाहेर जातात. त्यामध्ये गैर काहीच नाही. मात्र, परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर या तरुणांनी पुन्हा मायदेशी परत येऊन, देशाच्या विकासात योगदान द्यावे’, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ गुरुवारी (दि.29) व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विविध शैक्षणिक शाखांमध्ये सुवर्णपदक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. त्यावेळी नायडू बोलत होते. विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या या कार्यक्रमास बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पालकमंत्री गिरीष बापट, उद्योजक प्रतापसिंह जाधव, ऍड. विष्णू पारनेकर, कलिंगा इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा. अच्युत्य सामंता, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. एन. राजदान आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणात व्यंकय्या नायडू यांनी माता-पिता, गुरू, भारतीय संस्कृतीची महती सांगत विविधतेत एकता हे भारत देशाचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आपण आपल्या आईचा आदर करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे. मातृभाषेला कधीही विसरता कामा नये. त्याकरिता घर, कार्यालय व दैनंदिन जीवनात जास्तीत-जास्त मातृभाषेचा वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून दिलेले शिक्षण चिरंतन टिकते. मग ही मातृभाषा भाषा मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू अशी कोणतीही असो. इंग्रजांनी आपली मनोवृत्ती तयार केली आहे. आजही आपल्यावर इंग्रजी भाषेचा पगडा आहे. त्यामधून पहिल्यांदा बाहेर पडा. याकरिता पालकांनी आग्रही असले पाहिजे, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)