तरूणीवर चार वर्षाहून अधिक काळ बलात्कार करणारा जेरबंद

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी


लग्नाच्या अमिषाने केला अत्याचार

 

पुणे – लग्नाच्या अमिषाने तब्बल चार वर्षाहून अधिक काळ तरूणीवर शहराच्या विविध भागात नेवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी हेमंत विश्‍वास कंधारे (वय 37, रा. कलासागर सोसायटी, चांदणी चौक, कोथरूड) याला अटक केली आहे.
ही घटना सन 2014 ते 11 सटेंबर 2018 या कालावधीत कर्वे रस्ता, दांडेकर पूल परिसर, शिवणे आणि भूगाव येथे घडली. याबाबत 25 वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. कंधारे याने “तुझ्याशीच लग्न करणार आहे’ असे फिर्यादीला म्हणत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी “मी तुझ्याशी लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर’ म्हणत त्याने तिला शिवीगाळ केली. त्यामुळे तिने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सक्षमतेची आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, ा कृत्यासाठी कोणी मदत केली आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)