तरूणीला दीड लाखाला गंडा

पिंपरी – नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणीकडून ऑनलाईन दीड लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही नोकरी न देता तरुणीची फसवणूक केली. हा प्रकार 7 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान लोणावळा येथे घडला.

अंकिता राजू खजाना (वय-22, रा. आयएनएस शिवाजी, भुशी डॅमजवळ, रामनगर, लोणावळा) या तरुणीने लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंकिता लोणावळा येथे शिक्षण घेत आहे. एका मेल आयडी वरून तिला वारंवार नोकरी देण्याचे ई-मेल आले. तसेच तिला मोबाईलवर फोन करूनही नोकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले.

वारंवार येणाऱ्या ई-मेल आणि फोनवरून अंकिताने नोकरी करण्याचे मान्य केले. त्यानंतर नोकरीसाठी पैसे भरावे लागत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, अंकिताने वेळोवेळी आरोपींनी दिलेल्या खात्यावर 1 लाख 55 हजार रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींनी अंकितासोबतचा संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने लोणावळा पोलिसांत धाव घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)