तरूणाला पळवून नेऊन मारहाण

चिंचवड – दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्‍याने तरूणाला जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून नेले आणि झुडपांमध्ये नेऊन लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना चिखलीतील मोरे वस्ती ते चिंचवड-रामनगर दरम्यान घडली.

सचिन बापू सोनवणे (वय-20, रा. चिखली) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अस्लम मुजावर, आकाश शिनगारे, तुषार भंडारी, योगेश लहाने, पवन लष्करे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

सचिन आणि आरोपींची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. सचिन हा मित्रांसह चिखलीत बोलत उभा होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या टोळक्‍याने सचिनला कोयत्याचा धाक दाखवत जबरदस्तीने दुचाकीवर बसविले. त्यानंतर त्याला रामनगर येथील दाट झाडांमध्ये नेले. तेथे शिवीगाळ करत लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)