तरूणांच्या पुढाकारामुळेच इंदापुरातील गावे पाणीदार

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील 37 गावांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला; परंतु खऱ्या अर्थाने गावातील युवकांनी व विद्यार्थ्यांनी मेहनत, श्रम घेतल्यानेच गावे पाणीदार झाली असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 “गौरव जलरत्नांचा सन्मान महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम लोकनेते शंकरराव पाटील सभागृह इंदापूर येथे पार पडला, त्यावेळी आमदार भरणे बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार श्रीकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी सुर्यभान जाधव, कोरेगाव तालुक्‍यातील आदर्श सरपंच मनोज अनपट, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, आण्णासाहेब डालपे, शेखर पाटील, बाळासाहेब सोनवणे यांच्यासह अधिकारी व तालुक्‍यातील सरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार भरणे यांच्या हस्ते पत्रकार,भूमिपूत्र तसेच गावातील महिला यांचा सन्मान करण्यात आला.
आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, ज्या माणसांची गरज आहे ती माणसे आजच्या सन्मान सोहळ्यात पाहिला मिळाली. लोकांनी गावासाठी आपल्या मातीसाठी काम केले पाहिजे ही इरश्‍या मनात ठेवून श्रमदान झाल्याने गावात आनंद कायम दिसणार आहे. शासनाच्या जलयुक्‍त शिवार योजनेतून निधी तालुक्‍यातील गावागावांत आला; परंतु आपल्या हाताने केलेले श्रम हे मनाला सुखद आनंद देते म्हणूनच आगामी काळात उजनी जलाशय परिसरातील गावांनी देखील वॉटरकप स्पर्धात सहभागी झाले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पत्रकारांचा व योगदान देणाऱ्या संस्थाचा विषेश सन्मान करण्यात आला. यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धांचे दैनिक प्रभातने उत्कृष्ट वार्तांकन केल्याने त्याचा पुरस्कार “प्रभात’चे इंदापूर तलुका प्रतिनिधी पत्रकार नीलकंठ मोहिते यांनी स्वीकारला.

  • इंदापूर तालुक्‍यतील 37 गावांनी वॉटर कप स्पर्धत सहभाग नोंदविला होता; परंतु 20 ते 22 गावातून यासाठी योग्य प्रतिसाद मिळाला. या स्पर्धच्या माध्यमातून जी चळवळ सुरू झाली त्यामुळे अनेक नागरिकांना शिकता आले. दोन राजकीय पक्षामुळे रात्रं दिवस काम झाले, त्यामुळे खरी गमंत आली. काटी, लामजेवाडी व घोरपडवाडीने चांगले काम केले. पाणी फाउंदेशनमुळे ग्रामीण भागात पाण्याचे महत्त्व कळले
    – श्रीकंत पाटील, तहसीलदार, इंदापूर तालुका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)