तरुण कसा असावा?

जो भान ठेवून योजना आखतो आणि त्या आखलेल्या योजनेची बेभान होऊन अंमलबजावणी करतो त्याला तरुण म्हणतात असे बाबा आमटे म्हणायचे. मित्रांनो, जे जाते पण परत येत नाही ते आहे तारुण्य! म्हणूनच सर्व संधीचा फायदा सर्व तरुणांनी घेतला पाहिजे, आपल्यापुढील आव्हाने स्वीकारली पाहिजेत. तरुण हे शारीरिक, मानसिक, बौध्दिक व नैतिकदृष्ट्या समर्थ व संपन्न असले पाहिजेत. चांगली माणसे आयात करता येत नाहीत, ती घडवावी लागतात. म्हणूनच घडलेल्या तरुणांशिवाय या देशाला तरणोपाय नाही.

मित्रांनो, आजच्या या तरुणांवर देशाचा विकास, येणारा काळ आणि निर्माण होणाऱ्या अडचणी अवलंबून असतात. म्हणूनच आजचा तरुण सरळ व ज्ञानी असावा. तरुणांना गेलेला काळ कसा होता, सुरू असलेला काळ कसा आहे आणि येणारा काळ कसा असेल याची जाणीव असावी. समाजातील ढोंग, रूढी, भ्रष्टाचार आणि वाईट सवयी यांवर आळा घालून नवे जग निर्माण करण्यासाठी तरुणांनी एकत्र यावे. तरुणांच्या जीवनाला ध्येय असले पाहिजे. ध्येयाचा ध्यास असलाच पाहिजे, त्यामुळे आपत्ती-आपत्तीचा त्रास होत नाही. त्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट घेतलेच पाहिजे. उपनिषदांमध्ये तरुणांची लक्षणे सांगितलेली आहेत.

युवस्यात: साधु, युवाध्यासक:।। आशिष्ठी, दृढीष्ठी बलीष्ठी:।। तरुण हा साधू म्हणजे सरळ, निष्कपटी, निर्मळ आणि खिलाडू असला पाहिजे. गर्वाने झुकून न जाता यशाचा, तर सबब न सांगता अपयशाचा त्याला स्वीकार करता आला पाहिजे. ज्याला जगावे कशासाठी आणि मरावे कशासाठी हे समजते तोच तरुण. मित्रांनो, व्यसनांच्या आहारी जाऊ नये. व्यसन हा मनुष्याचा महान शत्रू आहे. आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवावे. तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये गुणसंपदा असायला हवी. जे कराल ते ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठता, सदाअध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्त्वाकांक्षा इति विद्यार्थीगुण पंचक्रमा आपल्या जीवनाकडे सकारात्मकपणे पाहत उत्स्फूर्तपणे आपलं आयुष्य आजच्या तरुणाईने जगलं पाहिजे तरच भारत एकदिवस तरुणांचा भारत म्हणून जगविख्यात होईल.

– भगवान गावित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)