तरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने? (भाग २)

तरुणी का त्रस्त आहेत गुडघ्याच्या आर्थरायटिसने? (भाग १)
गुडघ्यांच्या ऑस्टिओ आर्थरायटिसला प्रतिबंध करू शकतो का? 
वाढत्या वयानुसार गुडघ्यांचा थोडाफार ऱ्हास होणारच. केस पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे याप्रमाणेच गुडघ्यांमधील कास्थी पातळ होत जातात. सकस आहार आणि नियमित व्यायामाने आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतो आणि कास्थींचा ऱ्हास होणे काही प्रमाणात थांबवू शकतो. मधुमेहासारख्या वैद्यकीय समस्यांना दूर ठेवूनही ऑस्टिओ आर्थरायटिसला प्रतिबंध करता येऊ शकतो. आधुनिक वैद्यकशास्त्राने गुडघे प्रत्यारोपणाचा शोध लावत ऑस्टिओ आर्थरायटिसवर उपचार शोधले आहेत, पण ऑस्टिओ आर्थरायटिसचा प्रतिबंध करणे हा पुढील मोठा शोध असणार आहे. स्टेम सेलच्या क्षेत्रात चाललेल्या संशोधनामुळे येत्या काही दशकांमध्ये कास्थींचा ऱ्हास रोखण्यासाठी काही उपायांचा शोध लागू शकेल.
परंतु, ज्या महिलेला तरुण वयातच या आजाराच्या चौथ्या टप्प्याने गाठले आहे, त्या महिलेवर संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण हा काही सर्वात योग्य पर्याय असू शकत नाही? रुग्णाचे वय कितीही असले तरी संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण हा नेहमीच शेवटचा उपाय असतो. माझ्याकडे अनेक रुग्ण येतात, त्यांच्या गुडघ्याचा एक्‍स-रे दाखवतात आणि त्यांना गुडघे प्रत्यारोपणाची आवश्‍यकता आहे का, अशी विचारणा करतात. मी त्यांना सांगतो, केवळ एक्‍स-रे पाहून गुडघे प्रत्यारोपण करायचे की नाही ते ठरवता येत नाही. त्यांना वेदना किती प्रमाणात होत आहे, त्यांना नीट चालता येत नसल्यामुळे त्यांच्या राहणीमानावर किती परिणाम झाला आहे, या घटकांचाही विचार करण्यात येतो. स्नायू बळकट करणारा व्यायाम (फिजिओथेरपी) आणि जॉइंट सप्लिमेंट्‌स या उपचारांचा प्रथम विचार करण्यात येतो. त्यानंतर व्हिस्कोसप्लिमेंटेशन इंजेक्‍शन देण्यात येतात. ज्या रुग्णांवर या उपचारांचा परिणाम होत नाही. त्यांच्यावर गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जातो.
संपूर्ण गुडघे प्रत्यारोपणाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे तरुण महिलांनाही संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्या तरुण महिलांच्या गुडघ्यातील कास्थींचा एका बाजूला ऱ्हास झाला आहे, त्यांना अंशत: गुडघे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात येतो. या प्रकाराला युनिकॉन्डिलर नी रिप्लेसमेंट असे म्हणतात. या शस्त्रक्रियेनंतर रिकव्हरी वेगाने होते आणि कोणत्याही बंधनाशिवाय तरुण महिला आपली दैनंदिन कामे करू शकतात. वयोगट कोणताही असू दे, जर गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया योग्य रुग्णांवर केली तर त्यांना बराच काळ वेदनारहित आयुष्य जगता येईल.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)