तरुणावर केले कटर ब्लेडने तब्बल आठ वार

पाकिटमारीस विरोध करणाऱ्या केले कटर ब्लेडने तब्बल आठ वार

पुणे: शहरात वाटमारी करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या  प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना मारहाण करुन मोबाईल, पैशाचे पाकिट आदी किंमती ऐवज चोरला जात आहे. या वाटमाऱ्यांच्या मारहाणीचे प्रकार आता नागरिकांच्या जीवावरही बेतू लागले आहेत. अशाच एका घटनेत एका तरुणाच्या खिशातील पाकिट चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना विरोध केल्याने तीच्यावर ब्लेडने तब्बल आठ वार करण्यात आले आहेत. या तरुणाच्या छातीवर, चेहऱ्यावर, हनुवटीकर, ओठावर, गालावर, कानावर आणी हातावर ब्लेडने सपासप वार करण्यात आले आहेत. यामध्ये घटनेत रक्तबंबाळ झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे तीघा चोरट्यांनी एकट्या तरुणावर हा हल्ला केला आहे.

-Ads-

फिर्यादी ही 25 वर्षीय तरुणावर असून तो बुधवार पेठेत राहतो. तर ही घटना पहाटेच्या सुमारास सागर बिल्डीगं दुसरा मजला येथे घडली. हा तरुण त्याच्या मित्रास भेटून घरी परतत असताना ही घटना घडली. यातील आरोपी अजिंक्‍य याने फिर्यादी तरुणाच्या पॅंन्टच्या माजच्या खिशातील पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने प्रतिकार करताच अजिंक्‍य व त्याच्या दोन साथिदारांनी त्याला मागील बाजूने पकडून शिवीगाळ व हाताने मारहाण केली. यानंतर कटर ब्लेडने त्याच्या छातीवर, चेहऱ्यावर, ओठावर, हनुवटीवर, गालावर , कानावर आणी डाव्या हातावर सपासप वार केले. त्यांच्या किंकाळ्याने परिसरातील नागरिक धावून आल्यावर आरोपींनी पळ काढला. फरासखाना पोलिसांनी ही घटना कळताच त्यांनी काही तासांतच आरोपींना जेरबंद केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील करत आहेत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)