तरुणास आत्महत्येस प्रवृत्त ; पाच जणांवर गुन्हा

महाळुंगे इंगळे- बहुळ (ता. खेड) येथे 39 वर्षीय तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर सोमवारी (दि. 3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणाने शनिवारी (दि. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली होती. त्यानंतर चाकण पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली तर सोमवारी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय लक्ष्मण खलाटे (वय 39, रा. बहुळ, ता. खेड,) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर भरत बबन शेळके, शक्‍ती उर्फ बापू महादेव साबळे, मीना भरत शेळके, पिणु शेळके (सर्व रा. बहुळ, ता. खेड) व शशिकांत प्रकाश मोरे (रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर. संभाजी लक्ष्मण खलाटे (वय 43, रा. बहुळ, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)