तरुणावर धारदार शस्रांनी वार….

पुणे – किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून एकाने तरुणावर धारदार शस्रांनी वार केले. 27 जानेवारी रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास वडगांवशेरी येथील सोमनाथ नगरमधील ताजमहल सोसायटीत ही घटना घडली. चंदननगर पोलीसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे.

प्रशांत जगधने (वय 30, रा. वडगांवशेरी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. चंदननगर पोलीसांनी याप्रकरणी राजु विक्रम माळवदकर (वय 32, रा. नवभूमी मित्र मंडळ चौक, शास्रीनगर, कोथरुड) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार; राजु हा कैलास बोरगे यांच्या घराच्या दरवाजावर लाथा मारत होता. त्यावेळी प्रशांत याने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने राजु याने प्रशांत यांच्यावर धारदार शस्रांनी वार केले, यात प्रशांत हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक एन. जे. घाग अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)