तरुणावर खूनी हल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल

कोल्हापूर – हिरवडे दुमाला (ता. करवीर) येथे ओरडू नका असे सांगितल्याचा  राग मनात धरुन चौघांनी तरुणावर खूनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने सौरभ हिंदुराव कदम (वय २४) हा गंभीर जखमी झाला.याप्रकरणी करवीर पोलीसांनी तिघांना शुक्रवारी अटक केली असून, संशयित समाधान पाटील, अविनाश पाटील, सौरभ शेट्ये, आणि  प्रभु अशा  चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, हिरवडे दूमाला येथे अक्षय हिंदुराव कदम व त्याचे मित्र गुरुवारी रात्री भावकीतील व्यक्ति मृत झाल्याने गावातील चौकात श्रध्दांजली फलक लावत होते. संशयित आरोपी हे भाड्याने घेतलेले एल. ई. डी. दिवे परत करण्यासाठी आले होते. परत करुन जात असताना मोठ्याने ओरडून हुक्क्या मारत होते.यावेळी अक्षयचा भाऊ सौरभ कदम याने आमचे भावकीतील व्यक्ती मयत झाला आहे, तुम्ही ओरडू नका असे सांगितले. त्याचा राग मनात धरून, चौघांनी सौरभला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.संशयित समाधान पाटील याने लोखंडी रॉड डोक्यात, कपाळावर, मारल्याने सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले  करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)