तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी – चिंचवड येथे टोळक्‍याने पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री साडे अकराच्या सुमारास चिंचवड येथे घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या शुभम किसन थोरात (वय 20, रा. चिंचवड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रफीक उर्फ काळ्या शेख, महादेव कांबळे, महेश पाटोळे (सर्व रा. वेताळनगर, चिंचवड) यांच्यासह अन्य एका अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शुभम आणि आरोपी रफीक यांच्यामध्ये जुनी भांडणे आहेत. शुक्रवारी रात्री शुभम व त्याचा मित्र अक्षय ढोबळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये बोलत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी बेसावध असलेल्या शुभमला मारहाण सुरू केली. रफीक याने शुभमच्या डोक्‍यात कोयत्याने वार करून त्यास जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)