तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी- किरकोळ काराणावरुन पिंपळे गुरव येथे तरुणाला मारहाण करत तीघांनी कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि.3) रात्री दहाच्या सुमारास घडली. वैभव देवराम झांजरे (वय- 20 रा. पिंपळे गुरव) याने सांगवी पोलिस ठाण्यात गणेश मोटे, पप्पु गायकवाड,सोन्या पाटील व अश्‍विन चव्हाण (पूर्ण नाव-पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात मंगळवारी (दि.4) तक्रार दिली आहे. वैभव झांजरे हा उभा असताना तीघेही आरोपी तेथे आले व त्यांनी वैभव याला शिवीगाळ केली व त्याला लाथा बुक्कक्‍याने मारहाण करत त्याच्या पाठीवर कुंडीने मारहाण केली व गणेश मोटे याने त्याच्या कंबरेला असलेला कोयता काढून वैभवच्या दंडावर व डाव्या हाताच्या मनगटावर वार केले. यामध्ये वैभव हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांवर ही मारहाण करणे व बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)