तरुणावर कोयत्याने वार करुन 29 हजारांची लुट

पिंपरी (प्रतिनिधी) – मित्रासोबत बोलत उभ्या असलेल्या एका तरुणावर चार जणांच्या टोळक्‍याने कोयत्याने वार करुन त्याच्याजवळील एकूण 29 हजार रुपयांचा ऐवज हल्लेखोरांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची नेला. ही घटना रविवारी (दि.15) दुपारी साडेतीनच्या सुमारास निगडीतील ओटास्किम येथे असलेल्या राजनगर चौकात घडली. संभू अडागळे (वय 29, रा. ओटास्किम निगडी) असे कोयत्याने वार करुन लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चार अनोळखी व्यक्तिंविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याददाखल करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संभू अडागळे हा रविवारी निगडीतील ओटास्किम येथे असलेल्या राजनगर चौकात आपला मित्र सोमनाथ लष्करे याच्यासह बोलत उभा होता. त्यावेळी शंभू जवळ आलेल्या चार जणांनी संभु याला “तु संग्राम भोसले याच्याबरोबर रहायचे नाही’ अशी धमकी देत त्याच्यावर कोयत्याने वार करत, लाकडी स्टम्पने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील सोन्याची चेन व रोख रक्कम चार हजार रुपये असा एकूण 29 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिस्कावून नेला. या हल्ल्यात संभू गंभीर जखमी झाला आहे. चारही आरोपी अद्याप फरार आहेत. निगडी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)