तरुणाचे अपहरण व खंडणी प्रकरणात बीट मार्शलचा हात ?

तरुणाचे अपहरण व खंडणी प्रकरणात बीट मार्शलचा हात ?
तक्रार अर्जात बीट मार्शनले 2 लाख 40 हजार घेतल्याचा उल्लेख
पुणे,दि.27- अभियंता असलेल्या तरुणाची कार अडवून पिस्तूलाच्या धाकाने त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याच्याकडून 14 लाख 30 हजाराची खंडणी उकळण्यात आली. या खंडणी प्रकरणात दोघा बीट मार्शलनेही 2 लाख 40 हजार रुपये घेतले असल्याचे फिर्यादीने तक्रार अर्जात म्हटले आहे. या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेण्यात आली असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की राहुल मोनहर कटकमवार(37,रा.सिंहगड रोड) याने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटमवार हा एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. तो 22 मे रोजी सायंकाळी घरी निघाला होता. सोपानबाग येथे आरोपींनी त्याच्या कारला दुचाकी आडवी घालून त्याला थांबवले. यानंतर जबरदस्तीने कारमध्ये घुसून त्याच्या कारचा ताबा घेतला. त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. त्याला नाना पेठ, सेव्हन लव्हज चौक असे फिरवून कात्रज घाटात नेण्यात आले. यानंतर त्याच्या नातेवाईकांना फोन लावून चालकामार्फत 14 लाख 30 हजार रुपये मागवण्यात आले. ही रक्कम दिल्यानंतर 23 मे रोजी त्याला बावधान येथे सोडण्यात आले. दरम्यान कात्रज येथे आरोपी महामार्गावर फिर्यादीला घेऊन थांबले असताना गस्तीवरील दोन बीट मार्शत कारजवळ आले होते. बीट मार्शलला कारचा संशय आल्याने त्यांनी आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी थांबले असल्याचे सांगितले. यानंतर बीट मार्शलला बाजूला नेऊन 2 लाख 40 हजार देण्यात आले.
याप्रकारची तक्रार फिर्यादीने प्रथम सह आयुक्त रविंद्र कदम यांच्याकडे प्रत्यक्षात जाऊन दिली. यानंतर गुहयाचा तपास तातडीने युनिट पाचचे पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)