तरुणाचे अपहरण, खंडणी प्रकरणात बीट मार्शलचा हात?

तक्रार अर्जात 2 लाख 40 हजार घेतल्याचा उल्लेख


गुन्हे शाखेतर्फे होणार तपास

पुणे – अभियंता असलेल्या तरुणाची कार अडवून पिस्तूलाच्या धाकाने त्याचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्याच्याकडून 14 लाख 30 हजाराची खंडणी उकळण्यात आली. या खंडणी प्रकरणात दोघा बीट मार्शलनेही 2 लाख 40 हजार रुपये घेतले असल्याचे फिर्यादीने तक्रार अर्जात म्हटले आहे. या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेण्यात आली असून त्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

राहुल मनोहर कटकमवार (37, रा. सिंहगड रोड) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन वानवडी पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटकमवार हे एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. ते 22 मे रोजी सायंकाळी घरी निघाले होते. सोपानबाग येथे आरोपींनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी घालून थांबवले. यानंतर जबरदस्तीने कारमध्ये घुसून त्यांच्या कारचा ताबा घेतला. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली. त्यांना नाना पेठ, सेव्हन लव्हज चौक असे फिरवून कात्रज घाटात नेण्यात आले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांना फोन लावून चालकामार्फत 14 लाख 30 हजार रुपये मागवण्यात आले. ही रक्कम दिल्यानंतर 23 मे रोजी त्यांना बावधन येथे सोडण्यात आले.

दरम्यान कात्रज येथे आरोपी महामार्गावर फिर्यादीला घेऊन थांबले असताना गस्तीवरील दोन बीट मार्शत कारजवळ आले होते. बीट मार्शलला कारचा संशय आल्याने त्यांनी आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी थांबले असल्याचे सांगितले. यानंतर बीट मार्शलला बाजूला नेऊन 2 लाख 40 हजार देण्यात आले. याप्रकारची तक्रार फिर्यादीने प्रथम सहआयुक्त रवींद्र कदम यांच्याकडे प्रत्यक्षात जाऊन दिली. यानंतर गुन्ह्याचा तपास तातडीने युनिट पाचचे पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)