तरुणाची दोन लाखांची फसवणूक

पिंपरी – पुणे येथे एका खासगी कंपनीत नोकरी लावतो म्हणून 24 वर्षीय तरुणाची सुमारे 2 लाख रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी क्रांतीकुमार सालीकांती (वय-24, रा. हुलावळे, हिंजवडी) याने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीकुमार यांना पुणे येथील एका नामांकीत कंपनीमध्ये नोकरी लावतो असे सांगून फोनद्वारे व मेलद्वारे वारंवार पैसे मागून सुमारे 2 लाख 11 हजार 768 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 9 मार्च ते 14 मे 2018 या काळात करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एक अज्ञात महिला व पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)