तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने लांबविला

पुणे : पादचारी तरुणाचा एक हजार रुपयाचा मोबाइल जबरदस्तीने चोरण्यात आला. याप्रकरणी दुचाकीवरील दोन अज्ञातांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी समाधान क्षीरसागर (25, रा. आंबेडकरनगर) हे रात्री कात्रज सिग्नलजवळून पायी चालले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसका मारुन पळ काढला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एम. खानविलकर तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)