तरुणाईला रास दांडीया, गरब्याचे वेध

पिंपरी – नवरात्रोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने तरुणाईला रास दांडीया व गरब्याचे वेध लागले आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात रास दांडीया व गरबा खेळण्यासाठी तरुणाईसाठी नव-नवीन फॅन्सी ड्रेसेसचा ट्रेंन्ड व विविध प्रकारच्या आकर्षक दांडीया बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे.

गेल्या काही दिवसात दांडीया व गरबा खेळण्यासाठी तरुणाईची संख्या वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरात नवरात्रोत्सवाच्या काळात ठिक-ठिकाणी नवनवीन गाण्यांच्या तालावर गरबा व रास दांडीया खेळला जातो. यामध्ये, लहानांपासून ज्येष्ठापर्यत अनेकजण दांडीयाचा आनंद लुटतात. या काळात गरबा व दांडीया खेळण्यासाठी वेग-वेगळा पेहराव घालण्याची चढाओढ तरुणाईत लागलेली असते. या उत्सवासाठी यंदाच्या वर्षी बाजारपेठेत दांडीया व गरब्याच्या घागऱ्यांनी बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत.

-Ads-

घागऱ्यात टिप्पणी, हल्लीसका, ढोली नृत्य, मंजिरा आदी नृत्य प्रकारासाठी राजस्थानी घागरा व गुजराती घागऱ्याला तरुणाईची मोठी पसंती आहे. गरब्याच्या ड्रेसला चकमक, गोल आकाराचे आरसे, रेबीन, विविध रंगाच्या पट्टया असल्याने घागरा आकर्षित करत आहे. खास करुन लहान मुलींसाठी विविध रंगामध्ये घागरे पाहावयास मिळत आहेत. दांडीयासाठी तरुणामध्येही कुर्ता, पायजमा, झब्बा, राजस्थानी व गुजराती पेहरावातील विविध रंगाचे कपडे उपलब्ध आहेत. तसेच, कलरफुल दांडीया घेण्यासाठी गर्दी होत आहे. यंदा दांडीयाचे दर 50 रुपयांपासून 200 रुपयांपर्यत आहेत.

यंदाच्या वर्षी दांडीयामध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये, लहान मुलांसाठी विविध रंगाचे आवरण असलेले व हलक्‍या वजनाच्या दांडीया उपलब्ध आहेत. तसेच, विविध रंगाच्या दांडीया व गरब्यासाठी फॅन्सी ड्रेस बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. दोन दिवसापासून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. तसेच, यंदा फॅन्सी ड्रेस महाग असूनही तरुणाईची वाढती मागणी असल्याचे, व्यापारी उमेश सत्तेजा या व्यापाऱ्यांनी सांगितले.

दांडीयाचे प्रकार व किंमती
– संखेडा : 50 ते 80
– सलिया : 70 ते 150
– स्टील : 50 ते 60
– बेअरिंग : 80 ते 200
– लाकडी : 30 ते 50

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)