तरुणांनी सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालवू नये – आमोद भाटे

पिंपरी – विद्यार्थ्यांनी आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, ध्येय गाठताना लक्ष केंद्रित करावे, ध्येय गाठताना कठोर परिश्रम करावे. कारण परिश्रमाला पर्याय नाही. सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालू नये, असा सल्ला आयसीएआयचे पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष आमोद भाटे यांनी केले.

निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफचार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सीए विद्यार्थी परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयसीएआयच्या पश्चिम विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारीया, सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष युवराज तावरे, सचिव प्राजक्ता चिंचोळकर, तत्कलिक अध्यक्ष रवींद्र नेर्लीकर, माजी अध्यक्ष सुहास गार्डी, सुनील कारभारी, संतोष संचेती, अनिल अग्रवाल, सचिन बन्सल, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार धामणे, ओमकार डांगले, रिद्धी पांडे, ऋचा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आयसीएआयच्या हिशोब प्रणाली समितीचे अध्यक्ष शिवाजी झावरे यांच्या उपस्थितीत या परिषदेची सांगता झाली. ते म्हणाले की, सीए हा व्यवसाय अर्थकारणाशी संबंधीत आहे. केंद्र सरकारच्या बदलत्या ध्येय धोरणांवर आपल्याला अपडेट रहावे लागते. बदलत्या काळानुसार सीएंनी बदलले पाहिजे. सीए हा फायनान्शियल डॉक्‍टर असतो. समाजात आर्थिक परिवर्तन घडविण्याची जबाबदारी सीएंवर असल्याचे त्यांनी नमूद केले.

दोन दिवसीय परिषदेत पराग राठी, वर्धमान जैन, वैभव सांकला, भूषण तोष्णीवाल, अनुप पेंडसे, शेखर साने, रवी सोमाणी, कुसाइ गाववाला यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत 150 विद्यार्थी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)