तरुणांनी शेतीपुरक व्यवसायाकडे वळावे – उपसभापती जाधव

  • शेळगावात पशूंसाठी आयोजित सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

निमसाखर – उद्योगधंद्यात आणि विविध कंपन्यांत मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट निर्माण झाल्याने युवकांना नोकरी मिळणे मोठे अवघड झाले आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. यावर मात करण्यासाठी शेतीबरोबरच शेळीपालन, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या अन्य व्यवसाय वाढीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन बेरोजगारीवर मात करावी, असे मत इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मंगळवारी (दि 29) शेळगाव (ता. इंदापूर) तेलओढा येथे पशुवैद्यकीय सर्वरोग निदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते, यावेळी उपसभापती जाधव बोलत होते. शिबिराचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे वैभव असलेल्या खिल्लारी गायीच्या पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ संतोष भारती पशुधन विकास अधिकारी यांनी जनावरांच्या आरोग्यविषयी शेतकऱ्यांना आणि युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिबिरात डॉ. मारुती काझडे, डॉ. आर एस बांगर, डॉ. डी. आर. तांदळे, डॉ. बी. एन. कुंभार, डॉ. एस. बी. शेगर आणि डॉ. ए. बी. सकट यांनी 200 हून अधिक दुभत्या गायी, शेळ्या,म्हैस आदी जनावरांना जंतनाशक, घटसर्प, अंत्रविषार लसीकरण औषधोपचार केले, तसेच जनावरांच्या वंधत्वाची देखील तपासणी करण्यात आली.
यावेळी सरपंच उज्ज्वला शिंगाडे, फक्कड ननवरे, कर्मयोगीचे माजी संचालक बाबासाहेब शिंगाडे,महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन दुधाळ, कर्मयोगीचे संचालक राहुल जाधव, आबासाहेब शिंगाडे, शहाजी ननवरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ठोंबरे, सुभाष दुधाळ, जगन्नाथ ननवरे, राजेंद्र सुळ, अशोक ठोंबरे, पांडुरंग भोंग, ब्रम्ह्मदेव कोथमिरे, गणेश सोनवणे, बबन सुळ, नाना ठोंबरे, संतोष भोंग, दादाराम शिंदे, रामभाऊ भोंग, लखन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष भारती यांनी केले, तर आभार पशुधन पर्यवेक्षक डॉ. एस. बी. शेगर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)