तरुणांनी पंतप्रधान योजनांचा लाभ घ्यावा

बॅंक ऑफ बडोदा बॅंकेचे उपप्रबंधक डी. के. पंचोरी यांचे आवाहन

मंचर- सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी पंतप्रधान योजनांचा लाभ घ्यावा. पंतप्रधान जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या योजना आदी योजनांचा लाभ ग्राहकांनी घेऊन आपले कुटूंब सशक्त करावे, असे आवाहन बॅंक ऑफ बडोदा बॅंकेचे उपप्रबंधक डी. के. पंचोरी यांनी केले.
अवसरी खुर्द येथील बॅंक ऑफ बडोदा यांच्या वतीने आयोजित ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजीव पडवळ, सरपंच सुनिता कराळे, साईनाथ पतसंस्थेचे संचालक संजय चव्हाण, टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे, बॅकेच्या शाखाधिकारी आशा पांडे, अनिल खुशराम उपस्थित होते. यावेळी पंचोरी यांनी सोनेतारण कर्ज वितरणात उल्लेखनीय कामगिरी तसेच येथील ग्राहकांना पीक कर्ज, मुद्रा योजना, गृह कर्ज, कार कर्ज अशा विविध योजनेचा लाभ दिल्याबद्दल बॅंकेच्या शाखाधिकारी आशा पांडे यांचे विशेष कौतुक केले. ग्राहक मेळाव्यात संचालक संजय चव्हाण, सरपंच उत्तम टाव्हरे, मच्छिंद्र वायाळ समवेत शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)