तरुणांनी कौशल्याधारित शिक्षण घेण्याची आवश्‍यकता ः दिनेश जाधव

भिगवण- नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तरुणांनी पारंपरिक शिक्षणांबरोबर कौशल्याधारित शिक्षण घेण्याची गरज आहे, असे मत शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी दिनेश जाधव यांनी व्यक्त केले. भिगवण (ता. इंदापूर) येथील कला महाविद्यालय नोकरी व्यवस्थापन कक्ष, शंकरराव पाटील चॅजरटेबल ट्रस्ट आणि जावेद हजबब अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनेश जाधव बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, माजी सभापती रमेशराव जाधव, डॉ.प्रज्ञा लामतुरे, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. बाळासाहेब खरात होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य महादेव वाळुंज म्हणाले की, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य शिक्षण देऊन रोजगाराच्या संधी मिळविण्यायोग्य बनविण्याचा प्रयत्न होत आहे. तरुणांनी कोणत्याही उपलब्ध संधींचा अभ्यास करून योग्य कौशल्याचे प्रशिक्षण घेतल्यास समाजातील सुशिक्षित बरोजगारीची समस्या दुर होण्यास मदत होईल. यावेळी अमोल राऊत, सुनील टाकळकर, प्रमिला काळे, वैशाली मासाळ, सौरभ भोपे आणि महेश काशीद यांनी विविध कौशल्यांची माहीती देऊन प्रात्यक्षिके दाखविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत चवरे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले आणि प्रा. नवनाथ सावंत यांनी केले तर आभार प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी मानले.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)