तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात फेसबुकवरील समुपदेशनाची मदत

लॉस एंजल्स : फेसबुकवरील समुपदेशन तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे संशोधन ‘अ‍ॅडिक्शन’ या मासिकात नुकतेच प्रसिद्ध झाले असल्याचे वृत्त आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी फेसबुकचा ठरावीक कालावधीसाठी धूम्रपान करणाऱ्या तरुणांवर पडणारा प्रभाव तपासला. समाजमाध्यमांवरील तंबाखूविरोधी कार्यक्रम व्यसनापासून सहजपणे दूर घेऊन जातो, असे साहाय्यक प्राध्यापक डॅनियल रामो यांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ५०० जणांपैकी ४५ टक्के पुरुष होते. त्यातील ८७ टक्के मोठय़ा प्रमाणावर धूम्रपान करणारे होते. त्यात २१ वर्षांच्या तरुणांची संख्या अधिक होती. समाजमाध्यमांवरील कार्यक्रमामुळे व्यसनांना आळा घालण्याचे कार्य प्रभावीपणे करता येत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)