तरुणांकडून इलेक्‍ट्रिक स्कूटर विकसित 

संग्रहित छायाचित्र

बेंगळुरू – साधारण वर्षभराचा विलंब लागल्यानंतर बेंगळुरूमधील एथर एनर्जीकडून देशातील पहिली स्मार्ट इलेक्‍ट्रिक स्कूटर सादर करण्यात आली. स्टार्टअप कंपनीकडून 340 आणि 450 ही दोन मॉडेल बाजारात उतरविण्यात आले असून देशातील सर्वात वेगवान इलेक्‍ट्रिक दुचाकी ठरण्याची शक्‍यता आहे. मात्र कंपनीकडून सध्या बेंगळुरू शहरात सेवा देण्यात येत असून कालांतराने देशभर विस्तारण्यात येईल. वाहनप्रेमी ही इलेक्‍ट्रिक दुचाकी बाजारात येण्यासाठी दीर्घकालावधीपासून वाट पाहत होते. एथर 340 या मॉडेलची किंमत 1,09,750 रुपये असून 450 ची किंमत 1,24,750 रुपये आहे.

यामध्ये 22 हजार रुपयांचे अनुदान, जीएसटी, रस्ता करा, स्मार्ट कार्ड शुल्क, नोंदणी कार्ड आणि विमा यांचा समावेश आहे. ही दुचाकी खरेदी केल्यास वर्षभर मोफत दुरुस्ती, रोडसाईड असिस्टन्स आणि सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगची सेवा मिळेल. ही दोन्ही मॉडेल फास्ट चार्जिंग सपोर्ट करत असून केवळ एका तासात 80 टक्के बॅटरी चार्ज होत असल्याचा दावा करण्यात आला. या कंपनीला हीरो मोटोकॉर्पकडून साहाय्य मिळाले आहे. सात इंच टचस्क्रीन डिस्प्ले असून मॅपची सोय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)