तरी पुन्हा आम्हाला मतदान…

पात्र परिचय- जय – नमो; वीरू – धर्मेंद्र प्रधान; ठाकूर-अमित भाई
इंधनाचे दर मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच चालले अन जनतेमध्ये दृष्य हाहाकार उडाला. तसाच अदृष्य हाहाकार सत्ताधारी पक्षातही उडाला. आजवर पोवाडे गाणारे कव्वाली म्हणू लागले. भमिय कीर्तनाची जागा नटराजाच्या नर्तनाने घेतली. “अच्छे दिन’च्या “टायर’मधली हवा हळूहळू निघू लागली. त्यात आगामी वर्ष हे निवडणुकांचे, त्यामुळे कितीही वैगुण्य असले तरी पेट्रोलियममंत्री वीरूची तारिफ ही मतदार मौसीसमोर करण्याची जबाबदारी ऑल टाईम हिट जयवर आली. रंगीत तालिम करण्यासाठी व स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी जय, वीरू व ठाकूर यांनी गुप्त बैठक बोलावली. त्याचा तपशील आम्ही आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत, आपण तो भक्तीभावाने श्रवण करावा.

ठाकूर – रिवर्स गियर पडला आहे बरं, जय तुम्हे मतदार मौसी से वीरू की तारिफ करनी होगी. पेट्रोलचे दर कितीही वाढले असले तरी.
जय – आय एक्‍सेप्ट दी चॅलेंज. अमितभाई, थोडा टैम तुमी मौसीचा म्हणजे आपल्या मतदाराचा रोल करा. मी बघा कसा पटवते. अमितभाई मान डोलावतात.
जय – मित्रों… सॉरी. नमस्कार मौसीजी, पेट्रोल-डिझेलचे भाव खुप वाढलेत. मगर क्‍या करे कंपन्या आमचे ऐकतंच नाही ,त्यांना मोकळीक दिली आहे ना?’
मौसी – मोकळीक? लुटायची?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जय – छी छी छी मौसीजी. कैसी बाते करती हो? लुटले तर कॉंग्रेसने. आम्ही तर जनतेसाठी घाम गाळतोय, अठरा अठरा तास…
मौसी – बेटा, घाम तर जनतेचाही निघतो आहे. पेट्रोल पंपवर पोहोचताच.
जय – मौसी जी, तुम्ही तर नाराज झाल्या. मान्य आहे डिझेलचे भाव वधारले की महागाई वाढते, जनता त्रस्त होते. कमाई पुरत नाही. पण मग विकासही तर करायचा आहे ना?’
मौसी – अरे हो, पण विकास आहे की बाथरुम आहे?

जय – मौसीजी! आपल्याला विरोध करून देशविरोधी व्हायचेय की सपोर्ट करून देशभक्त व्हायचे आहे? थोडा त्याग तर देशासाठी करावाच लागणार ना?’
मौसी – म्हणजे तुमच्या धोरणांना सपोर्ट केला तर देशभक्त, नाहीतर चोर असेच ना?
जय – आता आमच्याकडे काही जादू तर नाही की कांडी फिरवली आणी कमी केले भाव.’
मौसी – जादूची कांडी नाही? मग कर्नाटक निवडणुकांत मतदान होईपर्यंत 20 दिवस भाव स्थिर कसे ठेवले हो? बडे आये दोस्त की वकालत करने.’

जय – ती जादू तर लोकसभा निवडणुकीतही दाखवूच. दर स्थिरच नाही, तर दोन पाच रुपयांनी भाव कमी पण करू चार पाच महिन्यासाठी.
मौसी (खुश होत) ओहो. तर हा प्लान आहे ? बढीया .
जय – तो फिर मै रिश्‍ता पक्का समझू? पुन्हा आम्ही? “पाच वर्ष दाणादाण, तरी पुन्हा आम्हाला मतदान.’ रंगीत तालिम यशस्वी झाली या आनंदात तिघेही एकमेकांना टाळ्या देतात.
– धनंजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)