…तरीही कांद्याचे दर “जैसे थे’!

खरेदी बाजार महागला : “स्टॉक’ असल्याने तूर्त दिलासा

पिंपरी – पुण्याच्या बाजारात कांद्याच्या खरेदी दरामध्ये वाढ झाली असून बाजारातील कांद्याचे दर “जैसे थे’च असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याची आवक कमी असून कांद्याचे दर स्थीर असल्याने कांद्याची मागणी होत आहे. पिंपरी बाजारातील काही व्यापाऱ्यांकडे कांद्याचा “स्टॉक’ असल्याने बाजार भाव वाढले तरी कांदा आहे त्याच भावाने मिळत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही आठवड्यापासून कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असून त्याची आवक कमी झाली आहे. यामुळे पुण्याच्या बाजारासह पिंपरीच्या बाजारातही कांद्याचे खरेदी दर 20 रूपये किलोवर गेले आहे. सध्या बाजारात काही व्यापाऱ्याकडे जुन्या कांद्याचा “स्टॉक’ असल्यामुळे बाजारात कांद्याचा खरेदी दर 20 रूपये किलो झाला असूनही व्यापारी त्याच दराने कांदा विकत आहेत. तसेच काही ठिकाणी 15 रूपये किलो दराने कांदा विकला जात आहे.

त्या कांद्याच्या गुणवत्तेनुसारही त्याचे दर ठरविले जात आहेत. बाजारात नवीन कांदा दाखल झाला आहे. मात्र, त्याला जास्त मागणी नसून जुन्याचा कांद्याला मागणी होत आहे. नवीन कांद्याला जुना व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे या महिन्यात कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्‍यता आहे. नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर कांद्याचे दर घसरतील. त्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी असल्याची माहिती विक्रेते आसिफ बागवान यांनी दिली. सध्या संगमनेर परिसरातून कांद्याची आवक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कांद्याची आवक घटली
पुण्याच्या बाजारात 35 नवीन कांद्याचे टेम्पो बुधवारी (दि. 24) दाखल झाले होते. त्यांचा दर 500 रूपये क्विंटल ते 1500 रूपये क्विंटलपर्यंत होता. तसेच जुन्या कांद्याचे 50 टेम्पो दाखल झाले होते. त्यांचे दर 500 रूपये क्विंटल ते 2000 रूपये क्विंटलपर्यंत होते. गेल्या काही आठवड्याची तुलना करया या आठवड्यात कांद्याची आवक घटल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)