…तरीही आम्ही भारताच्या पुढेच, चीनची उपरोधिक टीका

बीजिंग – भारतीय अंतराळ संशोधन संघटने एकाच उड्डाणात तब्बल 104 उपग्रहांचे अंतराळात विविध कक्षांमध्ये यशस्वी प्रक्षेपण केल्यानंतर जगभरातून भारतावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होत आहे. मात्र नेहमीप्रमाणेच चीनने उपरोधिक टीका केली आहे.

भारताच्या यशातून जगातील इतर देशांनी शिकले पाहिजे. खरे तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे. मर्यादित आर्थिक बळाच्या जोरावर घेतलेली गुरुडझेप वाखाणण्याजोगी आहे. मात्र तरीही चीन भारताच्या पुढे आहे, असे चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापण्यात आले आहे. तसेच भारत अजूनही स्वतःचे स्पेस स्टेशन उभारू शकला नसल्याचेही यात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)